| पनवेल | प्रतिनिधी |
अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि टी.एम.जी. क्रिएशन्सच्या संयुक्त विद्यमाने बारापाडा येथील बानुबाई वाडी आदिवासी पाड्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमांतर्गत डॉ. विजय मोरे, श्रद्धा सुर्वे, विजय सुर्वे, अशोक डिका, मिलिंद जाधव, सुखदा ठाकूर, सुनिता भुजबळ, विद्या डोंबे आदीने गाणी सादर केली. याप्रसंगी आदिवासी कलाकारांनी लोकनृत्य सादर केली.
कविता गर्ग, विद्या डोंबे, पाकीजा आत्तार, सतीश नेहे महादेव गायकर, भरत सकपाळ, ज्योती वाघ, नितीन जोशी, गजानन नरवडे, सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. जितेंद्र जोशी यांना राष्ट्रीय दीपज्योती एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऐश्वर्या पुणेकर, विलास खानोलकर यांना राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास मंगला बिराजदार, शंकर बिराजदार, सुनीता जोशी, एच. एन. पाटील, सुरेश भोपी, गणेश वाघमारे, अभिनेते कांबळे, उर्मिला डांगे, वर्षा पाचभाई, भगवान बडगुजर, पंडीत फंगाळ, कृष्णा कांबळे, मयूर शेलार, अर्चना घरत, आनंद माळी, विनायक सरवदे, डॉ. रेहाना मुजावर, राजेश राणे, शायना मीरजानकर, रेश्मा शेख, सुनील जोशी, दीपक कदम, नामदेव ठाकूर, प्रवीण गायकवाड, अद्वेत पुणेकर, मीना बडगुजर, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सलमा खान यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना एन.डी. खान यांची होती.






