| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 3 लाख 33 हजार 333 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी निलेश पवार (पुणे), पुणे युनिटचे जनरल सेक्रेटरी प्रमोद शिंदे तसेच नागपूर व विदर्भ युनिटचे जनरल सेक्रेटरी महेंद्र धोंडसे यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. दुष्काळामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाची जाणीव ठेवून असोसिएशनने सामाजिक बांधिलकीतून हा मदतीचा उपक्रम राबविला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत व पुनर्वसन कार्याला हातभार लावण्याचा यामागील उद्देश आहे. बँकिंग संस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी केवळ व्यावसायिक कर्तव्यांपुरती मर्यादित नसून समाजाप्रतीही योगदान देण्ो आवश्यक आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला. संकटाच्या काळात गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे.






