| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नांदाईपाडा मैदानावर सुरू असलेल्या अलिबाग प्रिमियर लीग या क्रिकेट सामन्यांच्या अखेरच्या दिवशी रायगड डायनमोझ पेझारी विरूद्ध संदीप इलेव्हन रहाटले हा दुसरा सामना पार पडला. या झालेल्या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी अतिशय सुंदर अशी खेळी करत सामना हा अतिशय अतितटीचा झाला होता. रायगड डायनामोज पेझारी या संघाने ही खेळी ३ धावांनी जिंकली असून हा संघ आता उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.