प्राथमिक शिक्षकांचे एक पाऊल सहकार्याचे
। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
राज्यात कोरोना महामारी विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये समाजातील विविध घटक आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाग्रस्तांना आपल्या परीने मदतीचा हात देत आहेत.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्या शिक्षकवृंदाने या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या सेवाभावी भावनेतुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा यांच्या वतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड केंद्राला सॅनिटायझर, टॉवेल, टुथपेस्ट, टुथब्रश, मिनरल व एनरजेल वॉटर, ड्रायफ्रुटस्, विविध प्रकारची फळं अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी म्हसळा पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँ.अध्यक्ष समिर बनकर, डॉ.अलंकार करंबे, सहाय्यक अधिक्षक विष्णू संबारे, रवी पाटील, केंद्र प्रमुख किशोर मोहिते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा अध्यक्ष नरेश सावंत, सरचिटणीस अण्णासाहेब बिचुकले, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.