। आगरदांडा । प्रतिनिधी ।
एकविसाव्या शतकात समाजात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे.मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. पहिले समाजांनी मुलीं-महिला विषयी मानसिकता बदली पाहीजेत तरच महिला सक्षम राहु शकतात असे मुरुड पोलिस उपनिरीक्षक-रेखा जगदाळे यांनी मुरूड वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष कार्यक्रमात बोलत होत्या.
महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.तरी ही महिला या बाबतीत तक्रार करत नाही आपण ज्या मार्गाने जातो त्या मार्गामध्ये छेडछाड होत असेल पहिले पोलिस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक आहे.फेसबुक,व्हॉटस अॅप हाताळत असताना आपले फोटो दुस-याला शेर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे तरी मुलींनी सावधगिरी बाळगुण सक्षम राहिले पाहिजे, आपल्या आत्याचारा विरोधात स्वतःच पुढे येऊन अत्याचाराच्या विरोधात लढा उभारला पाहिजे असे सांगितले.
महाविद्यालय विकास समिती-वासंती उमरोटकर म्हणाल्या सावित्रीबाई फुलेनी आपणास शिक्षणाचा अधिकार दिला त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नाही यासाठी मुलींनी स्वत: संरक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे यावेळी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सुभाष म्हात्रे तर आभारप्रदर्शन डॉ. सिमा नाहिद यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक-रेखा जगदाळे,वासंती उमरोटकर, डॉ.विश्वास चव्हाण, रिती वराडे, सुरेश वाघमारे, डॉ.सिमा नाहिद, डॉ.सुभाष म्हात्रे व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.