। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी रुजू झालेले पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी विजय तायडे यांचा निरोप समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केले. सूत्रसंचालन रामसेवक कांदे तर आभारप्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षिका तृप्ती बोराटे यांनी केले. या कार्यक्रमास तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, राजेश मपारा, आरिफ माणियार, पत्रकार गौसखान पठाण, पत्रकार मंगेश वाघमारे, पत्रकार दत्तात्रेय दळवी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.







