। अलिबाग । वार्ताहर ।
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज डिसेंबर 2021 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, तसेच अशा पात्र विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2021 अखेर कच्छी भवन नमिनाथ जैन मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग, ईमेल: या कार्यालयाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.