गणनेसाठी 28 परीक्षक सहभागी
। कोर्लई । वार्ताहर ।
महाराष्ट्र वनविभाग आणि ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांनी एकत्रितरित्या दि 7 ते 9 जानेवारी फणसाड वन्यजीव अभयारण्यात उपवनसंरक्षक व्ही.एन.पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक एन. एन. कुप्ते व वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी पक्षी गणना करण्यात आली. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना संबंधित पूर्ण दक्षता घेऊन ही गणना पार पाडण्यात आली.कोरोना-ओमायक्रान रोगाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता 45 ऐवजी 28 पक्षी निरीक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या कालावधीत येथे करण्यात आलेल्या पक्षी गणनेत 162 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये घशपींळीह झर्श्रेींशी, इर्श्रीशींहीेरीं, झरववूषळशश्रव थरीलश्रशी, धशश्रश्रेु-लीेुशव थरीलश्रशी या पक्ष्यांची नोंद पहिल्यांदाच अभयारण्यात झाली.
शिवाय पक्ष्यांव्यतिरिक्त खपवळरप ऋेीशीीं डलेीळिेप, खपवळरप तळेश्रशीं ढरीरर्पीींश्रर, इळीव ऊीेिळिपस डळिवशी, ॠीशशप र्कीपीीांरप डळिवशी या दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचे दर्शन झाले. महाराष्ट्रात गुहागरपासून दक्षिणेला दिसणार्या भिमपंखी या भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन दुसर्या पक्षी गणनेत झाले होते. यंदा हे फुलपाखरू पक्षी गणने दरम्यान 5 वेगवेगळ्या ठिकाणी दिसले. शिवाय ऊरीज्ञ झळशीीेीं, ढहीशश-ीिेीं ॠीरीी धशश्रश्रेु, डिेींश्रशीी ॠीरीी धशश्रश्रेु या ही दुर्मिळ फुलपाखरे दिसून आली.







