। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्वी अलिबाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आरोग्य विभाग पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर बुधवारी (दि.2) पार पडले. यावेळी लसीकरण करून घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत मोफत धान्य वाटप
करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी, होली चाईल्ड स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय मिर्जी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ओमकार पोटे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्रा. विक्रांत वार्डे, प्रा. तेजस म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील प्रा. रविंद्र पाटील, आरोग्य विभागातर्फे वंदना पवार, आरोग्य सेवक राठोड, अक्षय राठोड आणि विद्यार्थी आदि उपस्थित होते.