। मुंबई । वृत्तसंस्था ।
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आज ही अत्यंत वाईट घटना घडली आहे. एक स्वर्गीय सूर हरपला, आपल्या मराठी माणसातील एक हीरा हरवला आहे. शब्द तोकडे पडत आहे, असा स्वर पुन्हा होणे नाही. त्यांची आठवण माझ्या मनात कायम राहील. कायम भेटल्यावर नमस्कार हो असे आवर्जुन त्या म्हणायच्या. माझ्या त्या फॅन होत्या. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. – अशोक सराफ, अभिनेते