। अलिबाग । प्रतिनिधी ।
शासनाने पाली येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी 12 कोटी 50 लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांनी सुधागड येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे यांना प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.या कामाची सुरुवात सन 2021-22 या आर्थिक वर्षापासूनच होणार असून याकरिता या आर्थिक वर्षात (सन 2021-22) रु.1 कोटी 25 लक्ष, पुढील आर्थिक वर्षात (सन 2022-23) रु.5 कोटी 25 लक्ष तर त्यापुढील आर्थिक वर्षात (सन 2023-24) रु.6 कोटी खर्च अपेक्षित आहे.