। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीमध्ये मोफत रक्त व शुगर तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच निखिल मयेकर यांनी आरोग्यतपासणी शिबिरास भेट देऊन आढावा घेतला.
या शिबिरास ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 70 ग्रामस्थांनी रक्ततपासणी करून घेत लाभ घेतला. तसेच रक्ताचा रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्टप्रमाणे सर्वांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत व पूढील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.






