| रसायनी | वार्ताहर |
दांड – रसायनी रस्त्यावरील खाने आंबिवली थांब्याजवळ दुचाकीची डंपरला धडक होऊन मोटारसायकलस्वाराचा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दापिवली गावातील निखिल धनाजी पाटील (वय 21)हा मोटारसायकल (एम एच-14,जे व्ही-7239) वरुन जात असताना समोर असलेल्या डंपरला पाठीमागून मोटारसायकलची जोरदार धडक बसली.त्यात निखिलचा जागीच अंत झाला. अपघाताची नोंद रसायनी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.