| पोलादपूर | प्रतिनिधी |
महिला दिनाचे औचित्य साधत दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या पुढाकाराने मिस अँड मिसेस पोलादपूर 2022 ही सौंदर्यवतींसाठी स्पर्धा आणि फनी गेम्सचे आयोजन 10 मार्च रोजी करण्यात आले आहे. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता मिस अँड मिसेस पोलादपूर ही स्पर्धा होणार असून, यावेळी फनी गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे. स्वत:ची ओळख, वेस्टर्न फेरी आणि प्रश्नमंजुषा अशा तीन फेर्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक महिला स्पर्धकांनी श्रावणी शहा 8087586326, सारिका पालकर 9960008157, आदिती नगरकर 8446511563, उज्ज्वला शेठ 9890260291, सोनिया शेठ 8149778221 यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन दिशा सांस्कृतिक ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.