। श्रीवर्धन । वार्ताहर ।
राजभाषानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद, उरण यांच्या वतीने पीएनपी विद्यालय, मोठी जुई येथे कवितांचा जागर करण्यात आला. यावेळी म.रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, ज्येष्ठ कवी ए.डी. पाटील, शाळेचे चेअरमन नामदेव पाटील, व्हा. चेअरमन रमाकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना मोकल यांनी केले. कार्यक्रमात लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे, रंजना केणी, भ.पो. म्हात्रे, अमोल म्हात्रे, भरत पाटील, तन्वी भोपी, मानसी पाटील यांनी कविता वाचून सर्वांना काव्यानंद दिला. यावेळी यश भगत, ॠषभ पाटील, श्रुती पाटील, स्नेहा भोईर, नियती कोळी या विद्यार्थ्यांनीही स्वरचित कविता सादर केल्या. मुख्याध्यापक किशोर पाटील, रजनी तांडेल, नामदेव ठाकरे, शशिकांत पाटील, रवींद्र कदम, उत्तम पाटील व ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती.