। उरण । वार्ताहर ।
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील दीड हजार शाळांची वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये उरणमधील 11 शाळांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु उरण पंचायत समितीमधील शालेय यंत्रणा व वीज मंडळ अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. मग याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत व उरण पंचायत समिती शालेय व वीज मंडळ अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद नसून नक्की खरे व खोटे कोण बोलते असा सवाल येथील जनतेला पडला आहे. उरण पंचायत समितीमधील सहाय्यक गटविकास अधिकरी, खुशालचंद अंजने यांनी उरणमधील कोणत्याही शाळेचा वीज पुरवठा खंडित केला नसल्याचे सांगितले. तर उरण वीज मंडळाचे अधिकारी यांच्याकडेही विचारणा केली असता त्यांच्याकडेही याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी कबूल केले. मग तालुक्यातील 11 शाळा कोणत्या असा सवाल उपस्थित होत आहे.तालुक्यातील 11 शाळांचा समावेश असल्याचे सांगितले. उरणमधील शासकीय यंत्रणा तालुक्यातील कोणत्याही शाळेचा वीज पुरवठा खंडित केला नसल्याचे सांगते, तर वीज मंडळाकडेही याची कोणतीही माहिती नसल्याचे कबूल केले आहे. मग सदर माहिती विधानसभेत कशी गेली हे गुलदस्त्यातच आहे.