। पनवेल । संजय कदम ।
सध्या वीजग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या वीज बिलासोबत वाढीव रकमेची मागणी करणार्या बिलासंदर्भात नागरिकांना योग्य ती माहिती देण्याची मागणी कामोठे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कामोठे कार्यकारी अभियंता सिडको कामोठे या विभागात या महिन्यात वीज बिलासोबत वाढीव रकमेची मागणी करणारी बिले नागरिकांना प्राप्त झाली आहेत. या बिलाची आकारणी कशा आधारे आणि काय निकष लावून आपण केलीली आहे, त्यांचा कोणताही खुलासा महावितरण तर्फे प्राप्त झालेला नाही त्यामुळे नागरिकांना मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितील संबंधित खात्याने या विषयी एखादे परिपत्रक जारी केल्यास लोकांनी सुविधा होईल किंवा या विषयाची सविस्तर माहिती नागरिकांना दिल्यास या वाढीव बिलाची आकारणी, दरपत्रक इत्यादी गोष्टी आम्ही शिवसेने शाखेमार्फत व पदाधिकार्यांमार्फत नागरिकांना पुरवू जेणेकरून लोकांच्या मनातील शंका व संभ्रम दूर होतील अशी मागणी शिवसेना कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र-13 चे उप विभाग प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण विभागाचे म्हात्रे, सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे . यावेळी बबन गोगावले विभाग प्रमुख प्रभाग -13, संजय जंगम उप विभाग प्रमुख, संतोष कचरे शाखा प्रमुख सेक्टर -34 आणि प्रदीप तवणोजी गटप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.







