। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ एका वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ही घटना मंगळवारी (दि.26) घडली. या अपघातात एकूण चार वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ एका वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने पुढिल गाडीला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण चार गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.