। कोलाड । वार्ताहर ।
विश्वकर्मा सुतार लोहार समाजाची सभा नुकतीच प्रभू विश्वाकर्मा समाज मंदिर रोहे येथे पार पडली.या सभेत कोलाड तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव यशवंत सुतार यांची सुतार समाज रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान सालाबाद प्रमाने याही वर्षी विश्वकर्मा सुतार लोहार समाजाची सभा प्रभू विश्वकर्मा मंदिर रोहे येथे आयोजित करण्यात आली होती. नामदेव सुतार यांचे समाज क्षेत्रातिल काम पाहून तसेच अन्य क्षेत्रातील कामाची धडपड पाहून त्यांची रोहा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी राजेंद्र पेंदेरकर,खजिनदार सुधाकर सुतार,सेक्रेटरी राकेश सुतार,सह खजिनदार संजय मेस्त्री,सह सेक्रेटरी निलेश सुतार यांची नवनिर्वाचित निवड करण्यात आली आहे.तर यावेळी सदस्य धर्मेश सुतार,मनोज सुतार,महादेव सुतार,विजय देऊलकर,रमेश वाघोस्कर ,सुरेश सुतार,दिलीप सुतार,सल्लागार,संजय पांचाळ,भालचंद्र ढवुलकर,जनार्धन वागळेकर रमेश वाघोसकर,महेश नागावकर,सचिन भगत यांची निवड करण्यात आली आहे.