चार कोरोना मुक्त; 49 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 28 एप्रिल रोजी कोरोनाच्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली तर चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 49 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
पनवेल मनपा हद्दीत तीन नवे रूग्ण ते चार जणांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 352 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 605 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 49 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.