| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील गोमाशी ग्रामपंचायत मधील फणसवाडी येथे म्हसोबा मंदिराकडे जाणार्या रस्त्यालगत असलेला विद्युत खांब सडलेल्या अवस्थेत आहे. याची लेखी तक्रार गोमाशी ग्रामपंचायतीतर्फे 21 जानेवारी 2022 रोजी महावितरणचे पाली उपअभियंता यांच्या नावे करण्यात आली होती. मात्र, ही तक्रार करून तीन महिने झाले तरीही तरी त्या अर्जाची दखल विभागीय कार्यालयाकडून घेतली नाही. हा विद्युत खांब पडून कोणत्याही प्रकारची जीवितहानी, वित्तहानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी महावितरण पाली यांना स्वीकारावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी कृषीवलशी बोलताना दिली.







