। पाताळगंगा । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार दि.24 मार्च 2022 रोजी नियुक्त करण्यात आलेल्या खालापूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांची पहिली बैठक श्यामसुंदर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत 11 अर्ज प्राप्त झाले होते, त्याची छाननी झाल्यानंतर हे 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
बैठकीस तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, अध्यक्ष श्यामसुंदर साळवी, सदस्य संतोष विचारे, अनंता मेंगाळ, श्वेता मनवे, दीपक झेमसे, अनंता दळवी, दीपक पाटील, संदीप पाटील, अविनाश पाटील, अनंता पाटील, सचिव विजय पुजारी,अविनाश गुरळे, संतोष देवरुखकर उपस्थित होते. सर्वसाधारण 1101, अनु.जाती 85, अनु.जमाती 204, श्रावण बाळ 142, श्रावण बाळ जाती 12, जमाती121, सर्वसाधारण 216, जाती 31, जमाती 72, वृद्धपकाळ 275, विधवा 32, विकलांग 0, राष्ट्रीय कुटुंब 18 प्रमाणे आतापर्यंत लाभ देण्यात येत असल्याची माहिती नायब तहसिलदार तथा सचिव विजय पुजारी यांनी दिली.