पतीसह सासरा, दिर आणि जावे विरोधात गुन्हा दाखल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माहेराहून पैसे आणून द्यावेत तसेच पनवेल येथे रूम घेवून देण्याच्या मागणीसाठी तसेच शिविगाळी करुन वारंवार अपमान करून मारहाण करुन मानसिक व शारिरीक छळ जाच करणाऱ्या नवेदर बेली येथील पतीसह सासरा, दिर आणि जावे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 एप्रिल 2021 ते दि. 17 सप्टेंबर 2021 दरम्यान वा च्या दरम्यान मौजे नवेदर बेली महिला फिर्यादी रा.रुम नं.201 आयुष रेसिडेंन्सी, श्रीबाग नं.02 ता.अलिबाग यांचे आरोपी जितेंद्र चंद्रकांत ठाकूर रा.नवेदर बेली ता.अलिबाग यांचेशी दि. 25 मार्च 2021 रोजी लग्न झाले. एक महिन्यानंतर सासरचे नातेवाईक पतीसह सासरे आणि दिर जावू सर्व रा.नवेदर बेली ता.अलिबाग या चौघांनी फिर्यादी यांनी माहेराहून पैसे आणून द्यावेत तसेच पनवेल येथे रूम घेवून देण्याच्या मागणीसाठी तसेच घर सोडुन जावे म्हणुन त्यांना शिविगाळी करुन त्यांचा वारंवार अपमान केला व विनाकारण त्यांना मारहाण करुन फिर्यादी यांचा मानसिक व शारिरीक छळ जाच केला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.498 A,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.कावळे हे करीत आहेत