। नवीन पनवेल । वार्ताहर ।
आदई गावातील चार मजली इमारतीच्या टेरेसवर 33 वर्षीय महिलेला मारहाण करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार 22 मे रोजी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा सचिन गरुडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
आदई गावातील गणू पाटील यांच्या जागेत नवीन बांधकाम होत असलेल्या चार मजली इमारतीच्या टेरेसवर रेश्मा गरूडे या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. अज्ञात आरोपीने तिला मारहाण करून तिची हत्या केली आहे. अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत.