। पनवेल । वार्ताहर ।
भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्यावतीने (पोवंटा साहिब )हिमाचल प्रदेश या ठिकाणी भारतीय बॉडीबिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली.त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी महामार्ग पोलिस यांची 80 किलो वजनी गटामध्ये भारतीय संघात निवड करण्यात आली.
यापूर्वी त्यांनी ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते.तसेच सलग दोनवेळा मास्टर भारतश्री व मास्टर महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. सदरचया निवडी बद्दल रागिणी पुजारी,चेतन पाठारे, विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे लिगल अँडव्हायझर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक हेमंत नगराळे,डॉ.भूषणकुमार उपाध्याय,विनय कारगांवकर,अनुपकुमार सिंह, डॅा.जय जाधव, संजय जाधव,प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता पनवेल महापालिका. तसेच पोलीस खात्यातील त्यांचे सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.






