। म्हसळा । वार्ताहर ।
माझी वसुंधरा अभियानात म्हसळा पंचायतीने कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.त्याबद्दल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या वतीने नगरपंचायतीचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यटन विकास व पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष असहल कादरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,नगरसेवक संजय दिवेकर,स्वच्छता समन्वयक प्रियंका चव्हाण यांचा प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी प्रधान सचिव मनिषा पाटणकर,म्हैसकर (भा.प्र.से),अभियान संचालक सुधाकर बोबडे,पर्यावरण व वातावरण विभागप्रमुख,म्हसळा शहर युवक कार्यकर्ते नईम दळवी आदी मान्यवर उपस्थित होते