। तळा । वार्ताहर ।
तळा वाली रोहा रस्ता वाली पर्यंत चांगला असून वाली पासून खालची तांबडी पर्यंत अतीशय खराब झाल्याने वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्याबरोबर वळणाची झाडे झुडपे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून ती तोडली नसल्याने संपूर्ण रस्त्यावर आली आहेत हि अपघाताला आमंत्रण ठरु शकतात. आता पुन्हा पावसाळ्यात झाडे झुडपे वाढू लागणार आहेत त्यामुळे अपघाताची अधिक शक्यता निर्माण होणार आहे. वाली ते तांबडी व वरची तांबडी ते वराठी रस्त्याची चाळण झाली आहे.
सध्याच्या घडीला खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गाने अनेक पर्यटक मुरूड श्रीवर्धन, हरीहरेश्वर या पर्यटनासाठी येत असतात या पर्यटकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडले आहेत. सां.बा. विभागाचे अधिकारी प्रवास करीत असूनही रस्त्याच्या दुरावस्था कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी पर्यटकाकडून केला जात असून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.