ॲक्टीव रुग्णांची संख्या 531 वर 125 नवे कोरोना रूग्ण
65 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोनाची चौथी लाट जोर धरत असून तब्बल 531 ॲक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 11 तालुक्यात 125 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून दिवसभरात 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 66, पनवेल ग्रामीण 22, उरण 4, खालापूर 2, कर्जत 2, पेण 13, अलिबाग 4, माणगाव 3, रोहा 2, सुधागड 1, श्रीवर्धन 5 आणि महाड 1 असे 104 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 42, पनवेल ग्रामीण 10, खालापूर 4, अलिबाग 8, मुरुड 8 तर माणगाव 1 अशा एकूण 65 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 277 झाली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 048 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 इतका आहे. सद्यस्थितीत 531 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.