| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नडवली गावचा सुपुत्र व सर्पमित्र म्हणून विशेष ओळख असणार्या अजय भोसले याने दहा फूट लांबीच्या धामण सापास सुरक्षितपणे पकडून जीवदान दिले आहे.
त्याच्याच गावातील सुरेश भोसले यांच्या गुरांच्या गोठ्यात साप शिरला असल्याची माहिती मिळताच अजय भोसले याने तिथे जाऊन अत्यंत अडचणीच्या ठिकाणी शिरलेल्या बिनविषारी धामण सापास मोठ्या शिताफीने पकडून जीवदान दिले आहे. सर्पमित्र अजय याने धामण सापास पकडून पकडलेला साप हा धामण जातीतील असून, बिनविषारी असल्याचे सांगताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तत्पूर्वी, सापाबद्दल उलटसुलट चांगलीच चर्चा रंगात आली होती.
दहा फूट लांबीच्या धामण सापास मोठ्या कौशल्याने पकडून अजय सर्वांना चांगलेच आश्चर्यचकित केल्याने त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, सर्पमित्र अजय भोसले याने आतापर्यंत शेकडो विषारी व बिनविषारी सापांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना जीवदान दिले आहे.