| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागची वार्षिक सर्वसाधारण सभा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या सर्वसाधारण सभेत सभासदांच्या अलिबागेत शिक्षण घेणार्या गुणवंत नातवंडांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या सभासदांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंत अलिबाग येथे शिक्षण घेत असलेल्या नातवंडानी 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षेत 80 टक्के किंवा त्यापेक्षा ए 1, ए 2 श्रेणी मिळवलेली असल्यास तसेच स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण झाली असल्यास त्यांचा संस्थेमार्फत गुणगौरव करण्याचे ठरविले आहे. यासाठी सभासदांनी आपल्या गुणवंत नातवंडाच्या गुणपत्रिका 31 जुलै 2022 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात मंगळवार किंवा गुरुवार या दिवशी सकाळी 10 ते 12-30 या वेळेत सादर कराव्यात असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांनी केले आहे.