| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड शहरातील ओवी पुलेकर हिला राज्यस्तरीय आदर्श बालगौरव विशेष गुण रत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवार्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजि. ट्रस्ट संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. पाच वर्षीय ओवी मनोज पुलेकर हिला मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव, शामसुंदर महाराज सिन्नरकर, जनार्दन कोंडविलकर,मीनाक्षी गवळी, मनिषा कदम,मनोज पुलेकर, प्रीतम पुलेकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मनिषा कदम यांनी केले.







