। मुरुड/जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित चिटणीस अजित कासार यांचा विविध संघटनांकडून सत्कार करण्यात आला. मुरुड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी व त्यांचे सहकारी सचिन कासेकर, मंगेश कांबळे, मंगेश पाटील यांच्यासह वावडुंगी ग्रासमथ व महिलांनीसुद्धा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कासार हे मोठा निधी आणून गावाचा विकास करतील, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या सत्काराला उत्तर देताना अजित कासार यांनी आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील व जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास निधी आणून मुरुड तालुक्यातील विविध विभागाची विकासकामे करणार असल्याचे मनोगतात व्यक्त केले आहे.