| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीकडे उतरत असताना एस एस वाय मुळगाव ठाकुरवाडीकडे 30 फूट खोल दरीत बळगर कोसळला. चालक जखमी झाला असून त्याच्यावर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतुल विश्वनाथ शिंदे असे चालकाचे नाव आहे.
या अपघाताची माहिती मिळताच अपघात ग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी पोहचले. सदर अपघात स्थळ जागा दरीत असल्याने आणि माती भुसभुशीत झाल्याने यंत्रणांना प्रयत्न करावे लागत आहेत. सर्व इंटरनॅशनल स्पॉट दोन क्रेन यांनी शर्थीचे प्रयत्न करत सदर बलगर बाहेर काढला.
चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे शिफ्ट केले आहे. त्याला गंभीर जखमा झाल्या असून उपचार सुरू आहेत. थांबलेली वाहतूक खुली करण्यात आली आहे. सदर दरी 30 एक फूट खोल होती. बलगरमध्ये चाळीस टन सिमेंट होते. बलगर उलटल्याने पूर्ण लोड केबिन वरती होता त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी अडचण येत होती. शेवटी सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले. ड्रायव्हरला एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून. त्याच्या कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी पोचले आहेत.