। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून चांगलेच धुमशान घातलं आहे. हवामान विभागानेही कोकणात पुढील 4 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्यानं नदीच्या किनार्यावर राहणार्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.