। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात देखील घरोघरी तिरंगा आणि सागर स्वच्छ्ता अभियान राबविले जात आहे. दिनांक 9 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर झेंडा या कार्यक्रमा अंतर्गत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्वी अलिबागच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत आणि सामुहीक स्वच्छता प्रतिज्ञाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद रायगड जयवंत गायकवाड, पीएनपी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, बी. एड महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे, प्रा. नम्रता पाटील, ऋतुषा पाटील, प्रा. विक्रांत वार्डे, प्रा. रविंद्र पाटील, प्रा. दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक तेजस म्हात्रे यांच्या सूचनेने सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले तर विक्रांत वार्डे यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पाटील, प्रा.पल्लवी पाटील सर्व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेतली.