। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते.
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.