। अलिबाग । वार्ताहर ।
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त पीएनपी संकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, बी एड. महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे, महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे आणि शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.