। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीमध्ये डेंग्यूचा रुग्ण सापडला आहे. अरविंदकुमार (मूळ रा.कल्याण) असे त्याचे नाव आहे. तो बाजारपेठेत व्यवसाय करतो.त्याचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमका काय आजार आहे, हे स्पष्ट होईल. पण प्राथमिक माहितीनुसार त्याला डेंग्युची लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अरुणकुमार हा सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या भिंतीजवळ मोबाईल कव्हर्स व इतर वस्तू विक्री करतो. ही नेहमीच अस्वच्छ असल्याचा येथे वापर करणार्या नागरिकांचा आरोप आहे. तक्रार आल्यावर तिची स्वच्छता करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. तसेच आरोग्य विभागाने या ठिकाणी तात्काळ दखल घेत औषध फवारणी करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.