। नवीन पनवेल । वार्ताहर।
सकल मराठा समाजाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने त्यांना पनवेल तालुक्यातील खानाव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खानाव, कोंडले, वाकडी, महालुंगी, नेरे, शिवणसई, चिंचवली, उसर्ली, तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होता. यावेळी विनोद साबळे, गणेश कडू, रविन्द्र पाटील, विकास वारदे, नामदेव जमदाडे, दत्ता वारदे, पांडुरंग दिसले, दिनेश मांडवकर, विश्वास पाटील, रवि कर्णूक, रमेश वारदे, सचिन दिसले, उमेश वारदे, गणेश खाने, मनोहर आरीवले, लहू पाटील, शशिकांत खुटले, पद्माकर म्हस्कसकर, अनंता ठोंबरे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.