। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरसीएफ लिमिटेड ट्रॉम्बे आणि थळ युनिटमध्ये झालेल्या कामगार संघटना मान्यताप्राप्त निवडणुकीत आरसीएफ कर्मचारी संघटना बहुमताने निवडून आली. निवडणुकीमध्ये आरसीएफ कर्मचारी सेना, इंटक, बीएमएस या तीन संघटना मान्यताप्रातीसाठी एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. मात्र शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील,कामगार नेते प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सेना बहुमताने निवडून आली.
या निवडणुकीमध्ये कर्मचारी सेनेचे जनरल सचिव दत्ता परब आणि दिनेश कवाडे, संजय माळी, राजन ठाकूर, अशोक म्हात्रे, मनोज घरत, सुधीर दाते, विनोद रुईकर, श्रीरंग कटोर, प्रसन्ना कटोर, चित्रसेन कटोर, सोमनाथ कटोर, नरेंद्र दगडे, नितीन रोगे, प्रदीप पावशे, पद्माकर थळकर, गोविंद हामने, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश थळकर, जनार्दन पाटील आणि मुख्यतः शेकापचे खंदे कार्यकर्ते विवेक लडगे आणि सुरेश घरत यांच्या सहकार्यामुळे हा मोठा विजय मिळवता आला.