जनार्दन पार्टे यांची मागणी
| माथेरान | वार्ताहर |
काही वर्षांपासून माथेरान मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामे जोरात सुरू आहेत परंतु ही कामे करताना कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने आणि ज्या ज्या ठिकाणी पाईप लाईनची कामे करताना रस्त्याची खोदाई केली जात आहे ते रस्ते पूर्ववत केले जात नाहीत. त्यामुळे सर्वत्र रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाताहत झालेली आहे.
गावातील संपूर्ण रस्ते नगरपरिषदेच्या अखत्यारीत येत असताना नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने याकडे डोळेझाक केल्यामुळे संबंधित ठेकेदाराने सर्वच कामात चालढकल सुरू केली आहे. यावर संबंधित खात्याचा अंकुश नसल्याने कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना, पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी माथेरान पाणी पुरवठा व सनियंत्रण एक सदस्य समिती प्रमुख माथेरानचे जनार्दन शंकर पार्टे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
माथेरान शहर सुधारित पाणी पुरवठा योजने साठी 25 कोटी रुपये मंजूर करून कामाला सुरवात केली होती. या सुधारित पाणी योजने साठी आत्ता पर्यटन 40 कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहेत. तरी देखिल या सुधारित पाणी योजनेची कामे अजून पूर्ण झाली नाहीत.
माथेरान मध्ये सर्व विभागात सुधारित नवीन पाईप लाईन टाकताना ती कोठेही सरळ रेशेत न टाकता ती वर खाली झीक झ्याक अशा प्रकारे टाकली आहे. आणि ही लाईन टाकताना कोठेही वॉश आउट वॉल लावण्यात आले नाहीत.त्यामुळे या लाईन मध्ये कचरा अडकून चोकप झाल्यास तो दोष कोठे आहे हे कळत नाही त्यामुळे हा दोष शोधण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदुन कोठपर्यंत पाणी पास होते ते पाहिले जात आहे,असे पार्टे यांनी निदर्शनास आणले आहे.






