वाहतूक पोलिसांसाठी नवीन नियमावली
| उरण | प्रतिनिधी |
वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो. वाहतूक पोलीस नियम मोडणार्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि नियम मोडणार्यांना थेट त्यांच्या घरीच दंडाचं चलान पाठवलं जातं. मात्र आता नियम मोडणार्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. याबाबत वाहतुक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी आदेश काढलेत.
याबाबत सारंगल यांनी सांगितले की, आता वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. आणि जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढलेत. वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो.
वाहतूक पोलीस नियम मोडणार्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि नियम मोडणार्यांना थेट त्यांच्या घरीच दंडाचं चलान पाठवलं जातं. मात्र आता नियम मोडणार्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.
वाहतुकीचे नियम मोडले की त्याचे चलन आता थेट घरी येऊ लागले आहे. अनेकदा वाहतूक पोलीस सिग्नल संपला की किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले असतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. जर तुमचे चलन चुकीने काढले गेले असेल तर तुम्हाला अनेक स्तरांवर ते रद्द करता येते. वाहतूकीचे नियम मोडले की पावती फाडली जाते. परंतू अनेकदा चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. त्याविरोधात अपिल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारण आता दंडाची रक्कम काही हजारात गेली आहे. त्यामुळे पैसे वाचवायचे असतील तर आधी हे पर्याय अवलंबा. थोडा त्रास होईल परंतू ते चलन रद्द होईल. तुम्हाला आलेल्या दंडाच्या पावतीवर अपिल करण्याचे पर्याय तुम्हाला आधीपासूनच दिलेले आहेत. परंतू 99 टक्के लोकांना याची माहिती नसते. किंवा जर माहिती असलीच तर ती जुजबी असते. यामुळे चलन आले की तुम्ही तातडीने वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन करू शकता असे सांगितले आहे.