। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वांगणी रेल्वे स्थानका दरम्यान लोकल रेल्वे गाडीचा धक्का लागून एक अज्ञात व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 असे आहे. रेल्वे पोलिसांच्या वांगणी येथे असलेल्या पथकाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे शरीर सडपातळ असून त्याची उंची साडेपाच फूट असून रंगाने निमगोरा ,चेहरा उभट , डोक्याचे केस काळे, साधारण वाढलेले आणि दाढी केलेली असे आहे. त्या व्यक्तीच्या अंगावर लाल-काळ्या पट्या पट्यांचा फुल शर्ट, आत सफेद रंगाचे बनियन आणि निळसर रंगाची जीन्स पॅन्ट असा पेहराव आहे. याबाबत कोणासही माहिती असल्यास संबंधित व्यक्तींनी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कसबे यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.