• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

क्रिकेटचा ‘पॉकेट हर्क्युलस’!

Santosh Raul by Santosh Raul
October 18, 2022
in sliderhome, क्रीडा
0 0
0
क्रिकेटचा ‘पॉकेट हर्क्युलस’!
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ट्वेंटी-20 क्रिकेटचा अवतार काही नवा नाही. इंग्लंडमध्ये आणि आता काही देशांमध्ये सायंकाळी करायचा एक टाईमपास म्हणून हा क्रिकेट कित्येक दशकांपासून खेळला जातोय. आयसीसीने 2007 मध्ये या प्रकाराला अधिकृत विश्‍वचषकात परावर्तीत केले आणि आर्थिक यशाची गुरुकिल्ली आयसीसीला सापडली. भारताच्या 2007 च्या पहिल्यावहिल्या विश्‍वचषक विजेतेपदाने आयपीएल क्रिकेट संकल्पना जन्माला घातली. आयपीएलच्या यशामुळे आज जगभरात अधिकृत आणि अनधिकृत अशा शेकडो स्पर्धा अविरतपणे सुरू आहेत. या ट्वेंटी-20 क्रिकेट लीगनी आयसीसी आणि क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांची आर्थिक घडी बसविली. मरणावस्थेत असलेल्या कसोटी क्रिकेटला या क्रिकेटच्या यशाने नवसंजीवनी दिली. 50 षटकांचे क्रिकेट वाचले.

क्रिकेटच्या या छोटेखानी अवताराने कमी वेळेत सर्वांनाच श्रीमंत केले. त्यामध्ये खेळाडू, क्रिकेट संघटना आणि सर्व संबंधितांचा समावेश आहे. क्रिकेटला बदलत्या काळाच्या वेगाशी अनुरुप करणार्‍या या क्रिकेटने पंधरा वर्षांत क्रांतीच केली असे म्हणावे लागेल. या क्रिकेटने टेलिव्हिजन आणि बॉलिवूड, हॉलिवूडकडे आकर्षित झालेल्या युवा पिढीला आपल्याकडे खेचून घेतले. खेळाइतकेच मनोरंजन हा निव्वळ हेतू असणार्‍या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चीअर गर्ल्स, डिजे, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आदी गोष्टींनी या क्रिकेटला अधिक रंगती आणि रोमहर्षक केले.

जगभरचे नामवंत क्रिकेटपटू विविध देशांच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागले. या स्पर्धेच्या छोट्या-छोट्या ठिकाणी विश्‍वविख्यात खेळाडूंना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ अनुभवण्यासाठी नव्या पिढीच्या क्रीडाशौकिनांची झुंबड उडाली. निवृत्त झालेल्या नामवंत खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांसाठीही स्टेडियम्स हाऊसफुल्ल व्हायला लागली. क्रिकेटच्या या छोटेखानी अवताराचा आणि काळाचा तो महिमा होता. आज तोच महिमा ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळतोय. या छोटेखानी क्रिकेटचा व्याप प्रचंड वाढला. पाठीराखे वाढले आहेत. फ्रँचायझींचे संघ वाढले आहेत. जाहिरातदार वाढले आहेत. पुरस्कर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या क्रिकेटचे कव्हरेज अतिशय उत्तम प्रतीचे, आधुनिकतेच्या आधारे व्हावे यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे.

आयसीसीच्या या अवताराने ऑस्ट्रेलियात प्रथमच मोठ्या आकाराच्या स्टेडियमवर यंदा आपला विचार केला आहे. क्रिकेट मैदानावर खेळले जाते, त्यापेक्षा अधिक आकर्षक स्वरुपात मांडण्याचा यंदा प्रयत्न असेल. प्रत्येक सामना, सामन्यातील महत्त्वाचे क्षण तब्बल किमान 35 कॅमेरे टिपतील. त्या कॅमेर्‍यांनी टिपलेल्या क्षणांचे ‘ग्राफिक्स’ च्या सहाय्याने पृथःकरण केले जाईल. अनेक विश्‍वविख्यात क्रिकेटपटू त्या घटना, क्षणांचे विश्‍लेषण करुन, तमाम क्रिकेट रसिकांना अधिक शहाणे करुन सोडणार आहेत.

यंदा प्रथमच क्षेत्रव्यूहाचे ‘360 अंशांतून’ दर्शन घडणार आहे. रंगमंचावर ज्याप्रमाणे कलाकारांवरच फक्त प्रकाशझोत केंद्रित करण्याची सोय असते. त्याप्रमाणे क्रिकेटच्या संपूर्ण मैदानावर प्रत्येक खेळाडूवर, त्याच्या स्वतंत्र हालचालींवर प्रकाशझोत टाकण्याची व्यवस्था यंदा पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कप्तानाने लावलेले क्षेत्रव्यूह, त्याचे डावपेच याचेही आपल्याला पुराव्यासह दर्शन घडणार आहे. ‘ड्रोन कॅमेरा’ मैदानावर आणि सभोवतालचा परिसराचे सिंहावलोकन करताना, प्रेक्षकांना, टेलिव्हिजनवर सामना पाहणार्‍यांना तेथे असल्याचा ‘फिल’ देणार आहे. त्याशिवाय ‘डीआरएस’साठी ‘हॉक आय’ बॉल ट्रॅकिंग या सेवांचे नवे अवतार पहायला यावेळी मिळतील.

आतापर्यंत खेळाडूंच्या नावापलीकडे प्रत्यक्ष सामना सुरु असताना टेलिव्हिजन प्रेक्षकांना फारसे काही कळत नव्हते. यावेळी खेळाडूंची संपूर्ण कुंडलीच मांडली जाईल. थेट प्रक्षेपणाशिवाय फेसबुक, इंस्टाग्रामवर प्रत्येक लढतीची झळक पाहता येईल. अगदी जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत हे क्रिकेट पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी आयसीसीचे या खेळाच्या प्रचार व प्रसाराचे धोरण आहे. फुटबॉल लोकप्रिय असलेल्या युरोप, लॅटिन, अमेरिका खंडांतील देशांच्या क्रिकेट संघटनांनाही आर्थिक बळ मिळावे यासाठी आयसीसीने ट्वेंटी-20 लिग आयोजित करण्याचा परवानाही दिला आहे. क्रिकेटच्या वटवृक्षाची मुळे अशी, आता जगभरात पसरण्याची ही सुरुवात आहे.

ऑस्ट्रेलियाला किंवा तेथील क्रिकेटरसिकांना ट्वेंटी-20 क्रिकेट हे काही नवे नाही. त्यांनी बीग बॅश आणि अन्य स्थानिक स्पर्धांमध्ये या क्रिकेटला कित्येक वर्षांपासून जवळून पाहिलंय. मात्र, 1992 आणि 2015 या दोन्ही वर्षी 50-50 षटकांच्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धांचा आनंद लुटलेल्या प्रेक्षकांसाठी ट्वेंटी-20 क्रिकेटचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रतीक्षेत गेली चार वर्षे असलेल्या या सर्वांची प्रतीक्षा आता संपली आहे. ‘कोरोना’नंतर पुढे जात राहिलेली ही स्पर्धा अखेर ऑस्ट्रेलियात यंदा प्रथमच साकारत आहे. ऑस्ट्रेलियन सरकारचादेखील यावेळी प्रत्यक्षात या स्पर्धेत सहभाग असणार आहे, हेही विशेष आहे.

यंदाच्या स्पर्धेचे आयोजन ‘सुपर खेल’ म्हणजे एकूण 12 संघांत होणार आहे. पहिल्या आठ क्रमांकाचे संघ स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरणार आहे. उर्वरित 4 संघ पात्रता फेरीतून या मुख्य स्पर्धेत दाखल होत आहेत. ‘सुपर 12’ स्पर्धेला 22 ऑक्टोबरपासून गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यातील सिडनी येथील स्पर्धेने प्रारंभ होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शोपीस लढत 23 ऑक्टोबरला मेलबर्नला होईल.

नामिबिया, हॉलंड, यू.ए.ई., श्रीलंका हे संघ पात्रता फेरीच्या ‘अ’ गटात तर आयर्लंड, स्कॉटलंड, विंडिज, झिम्बाब्वे हे संघ ‘ब’ गटात आहेत. मुख्य स्पर्धेत पात्र ठरलेल्या आठ संघांपैकी ‘अ’ गटात, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आहेत. ‘ब’ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. या दोन गटांमध्ये पात्रता फेरीतील प्रत्येक गटातील विजेता-उपविजेता संघ दाखल होईल आणि मुख्य स्पर्धेला, म्हणजे ‘सुपर 12’ला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.

Related

Tags: cricketkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperonline marathi newsvinayak dalvi
Previous Post

ममदापूरवाडीत पाणी टंचाई; ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल

Next Post

कामोठे पोस्ट कार्यालय स्थलांतराची मागणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
Next Post
कामोठे पोस्ट कार्यालय स्थलांतराची मागणी

कामोठे पोस्ट कार्यालय स्थलांतराची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?