| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आवास, ता.अलिबाग येथील श्री.नागेश्वर मंदिराची वार्षिक यात्रा रविवार हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. साजगाव यात्रेनंतर लगेचच आवासची यात्रा भरते. गेली दोन वर्षे कोरोना साथीमुळे जिल्ह्यात कुठल्याच यात्रा भरल्या नव्हत्या. पण आता निर्बंधमुक्तीने यात्रांचा माहोल तयार झाला आहे. रविवारी पहाटेपासून आवासला नागेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी वाढतच राहिल.आवासच्या यात्रेला बैलगाडीतूून दर्शनाला येण्याची परंपरा अनेक कुटुंबात आहे. यावेळीही ती दिसून आली. व्यावसिकांचाही व्यवसायही जोरात सुरु होता.