। कर्जत । प्रतिनिधी ।
राज्यपाल सवभगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी नागरिक व विविध संघटनांनी पुकारलेल्या कर्जत बंदसा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. सकल मराठा समाजासह व्यापारी वर्गही या बंदमध्ये सहभागी झाला होता.
राज्यपालांसह अन्य भाजप नेत्यांचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सर्व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित झाले होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या बद्दल या सर्वांचा जोरदार घोषणा देऊन निषेध केला. राज्यपाल हटावचा नारा देत घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे, माजी सरपंच मधुकर घारे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शंकर थोरवे, अनिल भोसले, दिपक भालेराव आदींनी आपल्या मनोगतातून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्या राज्यपाल कोश्यारी आणि अन्य नेत्यांचा जाहीर निषेध केला. त्यानंतर बाजारपेठेतून निषेध फेरी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आणि तेथेही जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शिवप्रेमी संघटनांनी पुकारलेल्या बंदला कर्जत मधील व्यापार्यांनी शंभर टक्के बंद ठेऊन उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या प्रसंगी माजी सभापती प्रदीप ठाकरे, अनिल भोसले, जगदीश ठाकरे, सोमनाथ पालकर, रत्नाकर बडेकर, सोमनाथ ठोंबरे, ज्ञानेश्वर भालीवडे, मुकेश पाटील, संतोष पाटील, संतोष थोरवे, भानुदास मिसाळ, अंकुश मोधळे, रवी मोधळे, कैलास म्हामले, सुहास वांजळे, अरुण देशमुख, केशव वांजळे, नैनेश दिघे, मनोज लाड, निखिल लाड, प्रमोद लाड, अॅड. भाऊ मोरे, शेखर शहासने नदिम खान, अमीर मणियार, संजय धामनसे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.