| पुणे | प्रतिनिधी |
कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या पुरस्काराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला होता. पण नंतर राज्य सरकारनं तो पुरस्कार अचानकपणे रद्द केला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर आणि प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना त्यांनी तसं पत्र पाठवलं आहे.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.आपण या लोकांना निवडूण देतो,त्याचीच ही फळे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.







