वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान
| सुकेळी | वार्ताहर |
रोहा, सुधागड तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये अवकाळी पडलेल्या पावसामुळे वाल,आंबा पिकांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बागायतदारांसह व वीटभट्टयांचे देखील अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये व वीट व्यावसायिकांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता भरपूर प्रमाणात होती. पावसाने सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास नागोठणे, पाली आदी परिसरात पावसाने दमदार सुरुवात केली. पावसाची रिपरिप ही बराचवेळ चालूच होती. तसेच काही ठिकाणी विजेचासुद्धा खेळखंडोबा झाला होता. अवकाळी पावसामुळे सध्या जे शेतामध्ये वाळाचे पीक तयार झाले होते ते पूर्णपणे खराब होण्याची भीती शेतकरी वर्गांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे दुबार वाल लागवडीची वेळ ही शेतकर्यांवर येण्याची शक्यता आहे. तसेच आंबा बागायतदार वीटभट्टी व्यावसायिकांचेपण नुकसान झाले असून काही वीटभट्टी व्यावसायिकांनी वीटांवरती ताडपत्री टाकून थोड्याफार प्रमाणात आपले नुकसान होण्याचे वाचवले आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील वारंवार होणार्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे . यायध्ये अनेकांना ताप, सर्दी, खोकळा, डोकेदुखी अशा आजारांना निमंत्रण द्यावे लागत असल्यामुळे अनेक दवाखाने फुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे .






