| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील होणार्या 4 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी 12कंट्रोल युनीट आणि 17 बॅलेट युनीट सीलबंद करण्यात आले आहेत .शनिवारी सकाळी 11वाजता या मशीन मतदान केंद्रावर पाठविले जाणार आहेत. यासाठी वाहतुकीसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुरुड नायब तहसीलदार -रविंद्र सानप यांनी दिली.
यावेळी मुरुड निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार-रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी , नायब तहसीलदार -गोविंद कोटंबे, सुग्रीव वाघ, राकेश पाटील,साहिल मुजावर, प्रकाश आरेकर, मनोज पुलेकर, आशिष मुकणे,सचिन मुनेश्वर आदिंसह अधिकारी या कंट्रोल युनिट व बॅलेट युनीट सीलबंद करतेवेळी उपस्थित होते.