| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील विरेश्वर रिक्षा स्टॉप चालक-मालक संघटना आयोजित ओव्हरआर्म टेनिस बॉल किकेट स्पर्धेत किशोर जाधव हा संघ विजेता ठरला तर राजा विन्हेरकर या संघाला उपविजेतेपदावर समाधान माणावे लागले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज राजा विन्हेरकर, तसेच उत्कृष्ट गोलंदाज.लखन पोटसुरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समीर पेंढारी, तसेच सामानवीर राजा विन्हेरकर यांना देण्यात आले.
चांदे किंडागण महाड येथे दि. 15 जानेवारी रोजी कै. रमेश सकपाळ क्रीडानगरी या प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आल होते. सहा संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी मनोहर रेशीम, जितू बाईत, सुदेश शिरशिवकर, बाळा पानावकर, देवळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.